बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. सध्या ती आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अर्जुन कपूरने स्वतःला सिंगल घोषित करून या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला आहे.
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी थोडासा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये तीन पर्याय दिले होते—पहिला, ‘मी रिलेशनशिपमध्ये’; दुसरा, ‘सिंगल’; आणि तिसरा, ‘हीहीही’. मात्र, मलायकाने कोणताही स्पष्ट पर्याय निवडला नाही, पण तिची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
अर्जुन कपूरने ब्रेकअपबद्दल केले उघडपणे भाष्य
अर्जुन कपूरने काही दिवसांपूर्वी दिवाळी पार्टीदरम्यान पापाराझींशी संवाद साधताना त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर भाष्य केलं. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, “मी आता सिंगल आहे.” गेल्या काही महिन्यांपासून मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत होत्या, परंतु यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.
मलायका-अर्जुनचा नात्याचा प्रवास
मलायका आणि अर्जुनने 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या नात्याविषयी दोघांनी मौन बाळगलं होतं, मात्र नंतर सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांनी आपलं नातं अधिकृत केलं. या जोडप्याचे फोटो आणि पोस्ट नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असत.
मलायकाने अभिनेता अरबाज खानसोबत 19 वर्षे संसार केला होता. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. मात्र, 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबत नवे नाते सुरू केले होते.
आता मलायका आणि अर्जुन यांचे वेगळे होणे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी ठरली आहे. त्यांच्या आगामी योजनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड