निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांचा पराभव डिपॉझिट जप्त होण्यातून अधोरेखित होतो. यंदा राज्यातील निवडणुकीत किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल. डिपॉझिट जप्त होणे म्हणजे उमेदवारासाठी मोठा धक्का, कारण वैध मतांच्या एकषष्ठांशपेक्षाही कमी मते मिळाल्यास ही रक्कम जप्त होते.
लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अनेकजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. काहीजण राजकीय पक्षांपासून स्वतंत्र राहूनही निवडणूक मैदानात उतरतात. सर्वसामान्य गटातील उमेदवारांना १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती गटातील उमेदवारांना ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते.
या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली एकूण वैध मते नोटाच्या (NOTA) मतांशिवाय मोजली जातात. जर उमेदवाराला एकषष्ठांश मतेही मिळाली नाहीत, तर त्यांची डिपॉझिट रक्कम जप्त होईल.
डिपॉझिट रक्कम परत मिळण्याचे निकष
उमेदवाराचे नामनिर्देशन अवैध ठरल्यास किंवा नाकारले गेल्यास डिपॉझिट रक्कम परत केली जाते.
उमेदवारी मागे घेतल्यासही रक्कम परत मिळते.
निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांना अनामत रक्कम परत दिली जाते.
मतदानाच्या आधीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला ही रक्कम परत केली जाते.
या नियमांमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते. उद्याच्या निकालांतून अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
- महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण, दोन वर्षांत काम पूर्ण
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
- वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण रद्द
- अभियंत्रिकी पदवी प्रवेश 2025: पहिली गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी होणार जाहीर
- महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर: बारावीचा 43.65%, तर दहावीचा 36.48% निकाल