05 जुलै 2025 | दुपारी 12:30 वा: वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी सांडवा पातळीच्या वर गेली आहे. परिणामी, धरण व्यवस्थापनाने आज दुपारी 12:30 वाजता वक्रद्वारांद्वारे 2870 क्युसेक आणि विद्युतगृहातून 1630 क्युसेक, अशा एकूण 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू केला आहे.
धरणातील पाणी नियंत्रीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवले किंवा कमी केले जाऊ शकते. या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी, व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे.