टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने स्कॅम आणि फिशिंग अटॅक्सवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. TRAI ने कमर्शियल मेसेज आणि OTP संबंधित ट्रेसेबिलिटी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम तारीख 1 डिसेंबर निश्चित केली आहे. याआधी ही तारीख 1 ऑक्टोबर आणि नंतर 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
का आवश्यक आहेत हे नवीन नियम?
सतत वाढत असलेल्या अनावश्यक कमर्शियल मेसेजेस आणि फिशिंग अटॅक्समुळे ग्राहकांना आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी TRAI ने हे कठोर पाऊल उचलले आहे. फिशिंग अटॅक्समुळे ग्राहकांचे OTP आणि अन्य संवेदनशील माहिती लीक होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
टेलिकॉम कंपन्यांचा प्रतिसाद
एअरटेल, जिओ आणि VI यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी TRAI ला सांगितले आहे की, अनेक टेलीमार्केटिंग कंपन्या या नव्या नियमांचे पालन करण्यासाठी अद्याप तयार नाहीत. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. तरीही, TRAI ने या विषयाला गांभीर्याने घेत लवकरात लवकर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेटवर्क कव्हरेजची माहिती देणे अनिवार्य
TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या नेटवर्क कव्हरेजची सविस्तर माहिती त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांसाठी ही माहिती अधिक सुलभ करण्यासाठी ती नकाशाच्या स्वरूपात देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या भागातील नेटवर्कची गुणवत्ता आणि स्पीड समजण्यास मदत होईल.
ग्राहकांसाठी सुरक्षित आणि पारदर्शक वातावरण
TRAI च्या या नवीन नियमांमुळे केवळ फिशिंग अटॅक्स आणि स्कॅम थांबवणे शक्य होणार नाही, तर ग्राहकांना एक सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळण्यास मदत होणार आहे. आता TRAI ने या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला असून, टेलिकॉम कंपन्यांनीही या बदलांसाठी तयारी करणे आवश्यक आहे.
- टेस्ला शोरूम उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल – “२५ लाखांची कार ६० लाखांना, जबाबदार कोण?”
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल लांबला
- TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक
- Vivo X200 FE भारतात लॉन्च: डायरेक्ट अॅपलसोबत स्पर्धा? Samsung आणि गुगलने ही घेतला धसका
- TAIT 2025 परीक्षा : B.Ed Appeared उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, गुणपत्रक पाठवण्यास…