Hostel Student Allowance: वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; आता या विद्यार्थ्यांना अधिक आर्थिक मदत
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ५८,७०० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांच्या वसतिगृह भत्त्यात लक्षणीय वाढ केली आहे. सध्या ४९० शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता निर्वाह भत्ता, आहार भत्ता आणि शैक्षणिक साहित्य भत्त्याच्या स्वरूपात अधिक रक्कम मिळणार आहे. ही वाढ महागाई आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे.