Mukesh Khanna: शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार; संकेत मिळाले टीझरमधून

भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळाले आहेत. अभिनेता मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’चा टीझर रिलीज केला असून, या टीझरमध्ये शक्तिमान आपल्याच जोशपूर्ण आणि ओळखलेल्या अंदाजात गिरक्या घेत प्रवेश करतो. शक्तिमानचा हा जोश पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याची लोकप्रियता वाढताना दिसते.

टीझरमध्ये ‘शक्तिमान’ने प्रेक्षकांना उत्साहात संबोधित केल्याचे दिसते. त्याच्या पाठीमागे क्रांतीकारकांचे फोटो दिसत असून, “Its Time For Him To Return” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या टीझरमधून सूचित होते की शक्तिमानचा हा नव्याने प्रवास सुरू होणार आहे. सध्या या अवतारात शक्तिमान मालिका म्हणून येणार की चित्रपट रुपात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१९९७ साली दूरदर्शनवर सुरू झालेली शक्तिमान मालिका तब्बल ८ वर्षे घराघरात लोकप्रिय होती. त्यानंतर गेल्या १९ वर्षांपासून ही मालिका बंद होती. आता या दीर्घ कालावधीनंतर शक्तिमान पुन्हा पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत.

Leave a Comment