Punha Shivajiraje Bhosale release date: मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासाच्या झंझावाताची साक्ष देणारा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ही कलाकृती यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Punha Shivajiraje Bhosale movie)
“याजसाठी केला होता अट्टहास” ही ओळ या चित्रपटाच्या साराला अधोरेखित करते. स्वराज्याची आठवण, छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास, आणि नवा स्वराज्याभिमान – हे सगळं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रकट होणार आहे.(Shivaji Maharaj movie 2025)
चित्रपटात सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत दिसणार असून, सयाजी शिंदे, त्रीशा थोसार, शशांक शेंडे, विजय निकम यांसारख्या अनेक अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. संहितालेखन, दिग्दर्शन आणि पटकथेसह महेश मांजरेकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.(Mahesh Manjrekar new movie)
चित्रपटाचे निर्माते राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध असून, छायाचित्रण अभिमन्यू डांगे यांचे आहे. संवादलेखन सिद्धार्थ साळवी तर अतिरिक्त संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शन हितेश मोडक यांच्याकडे आहे.(Marathi historical movie 2025)
तांत्रिक बाजू अधिक भक्कम करण्यासाठी रेडचिलीज कलर आणि प्रसाद फिल्म लॅब्स यांसारख्या नामांकित स्टुडिओंनी या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. व्हीएफएक्स, साऊंड डिझाईन, मेकअप, आणि डिजिटल मार्केटिंग या सर्व अंगांवर भर देण्यात आला आहे.
दिवाळीच्या मंगलप्रसंगी महाराष्ट्रात अभिमान, प्रेरणा आणि इतिहासाचा गजर करणारा चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रदर्शित होतोय. ही कलाकृती इतिहास नव्याने उलगडणार आहे आणि प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शिवप्रेम जागवणार आहे.
#PunhaShivajirajeBhosale #ThisDiwali
3 thoughts on “‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत होतोय इतिहासाचा नवा गजर!”