क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकरशी केली जात होती तुलना पण यंदा कोणीच घेतल नाही विकत

पृथ्वी शॉ: क्रिकेट जगतामध्ये एक खेळाडू एका क्षणात स्टार बनतो, तर दुसऱ्या क्षणात तो झिरो होऊ शकतो. याच कारणामुळे क्रिकेट हा खेळ खूप अजब आहे. भारताचा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ याचं उदाहरण यावर योग्य ठरते. एकेकाळी ज्या पृथ्वी शॉची तुलना क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकरशी केली जात होती, तो आज मात्र पूर्णपणे घसरला आहे.

पृथ्वी शॉच्या कारकीर्दीत अलीकडील काळात खूप उतार-चढाव आले आहेत. एक काळ होता, जेव्हा तो भारतीय संघातला महत्त्वाचा हिस्सा होता, मात्र आता त्याला भारतीय संघात स्थान गमवावं लागलं आहे. त्याच्या आयपीएल करिअरमध्ये देखील ठराविक वेळेस त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणाऱ्या पृथ्वीला 2024 मध्ये आयपीएल लिलावात अनसोल्ड राहावं लागलं आहे. त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये असताना देखील, त्यावर एकाही संघाने बोली लावली नाही.


पृथ्वी शॉने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या फलंदाजीमुळे तो चर्चेत आला. 2024 पर्यंत, त्याने 79 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 1892 धावा निघाल्या आणि 14 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. परंतु, त्याच्या कारकिर्दीतील सातत्याची कमतरता आणि फिटनेस समस्यांमुळे त्याला आपल्या स्थानावर टिकाव ठेवता आले नाही.

पृथ्वी शॉने 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याच्या कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा हा स्फोटक फलंदाज काही महिन्यांनंतर वाद आणि प्रतिबंधित पदार्थ सेवनामुळे चर्चेत राहिला. 2019 मध्ये त्याच्यावर काही महिन्यांची बंदी देखील लावण्यात आली होती, ज्यामुळे त्याच्या आयपीएल आणि क्रिकेट करिअरवर मोठा प्रभाव पडला.



आज पृथ्वी शॉ एक असा खेळाडू बनला आहे, ज्याने एका वेगळ्या उंचीवर जाऊन पुन्हा त्या उंचीला गमावले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यामुळे त्याच्या भविष्यातील दिशा अनिश्चित आहे.

Leave a Comment