कधीकधी असे प्रसंग येतात की आपण काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असतो किंवा कोणत्यातरी व्यक्तीचा कॉल अटेंड करण्याची इच्छा नसते. अशा वेळी, फोन बंद न करता किंवा नंबर ब्लॉक न करता, ही परिस्थिती सहज टाळता येऊ शकते. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करता येतील.
फोन चालू ठेवून “स्वीच ऑफ” दर्शवण्याची पद्धत
1. कॉल सेटिंग्जमध्ये जा: फोनचे कॉल सेक्शन उघडा. त्यामध्ये “सप्लिमेंटरी सर्व्हिस” किंवा यासारखा काहीसा पर्याय शोधा. फोनच्या मॉडेलनुसार हे वेगवेगळ्या नावानेही असू शकते.
2. कॉल वेटिंग डिसेबल करा: कॉल वेटिंग पर्याय शोधून ते अक्षम करा. अनेक फोनमध्ये हे पर्याय आधीपासून सक्रिय असतात, त्यामुळे ते बंद करावे लागेल.

3. कॉल फॉरवर्डिंग सेट करा: आता कॉल फॉरवर्डिंगमध्ये जा. येथे व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल असे दोन पर्याय असतील. यापैकी व्हॉइस कॉल निवडा.
4. “फॉरवर्ड व्हेन बिझी” निवडा: येथे “फॉरवर्ड व्हेन बिझी” या पर्यायावर क्लिक करा. आता, कॉल फॉरवर्ड करायचा असलेला नंबर टाका, जो बंद आहे, म्हणजे कॉल आल्यास “स्वीच ऑफ” असा संदेश जाईल.
5. सेटिंग्ज सेव्ह करा: “Enable” बटणावर क्लिक करून सेटिंग्ज सक्रिय करा. आता कोणी कॉल केल्यास फोन स्विच ऑफ असल्याचे सांगेल.
कॉल करणाऱ्याचे नाव ओळखण्यासाठी
कॉल करणाऱ्याचे नाव कळावे यासाठी ट्रू कॉलर ॲप वापरता येईल.
1. ॲप स्टोअरमधून ट्रू कॉलर ॲप डाउनलोड करा आणि उघडा.
2. सेटिंग्जमध्ये जा आणि “कॉल्सची घोषणा करा” हे फीचर सक्षम करा.
3. यानंतर, जेव्हा कोणी कॉल करेल, तेव्हा कॉल करणाऱ्याचे नाव तुम्हाला सांगितले जाईल.
याप्रकारे, फोन स्वीच ऑफ असल्याचा आभास निर्माण करून आणि कॉल ओळखण्याची सोय ठेवून तुम्ही या समस्येचे समाधान करू शकता.