भारतीय प्रवासी आता परदेशातही Paytm UPI द्वारे कॅशलेस पेमेंट करू शकतात. ज्या देशांमध्ये UPI स्वीकारलं जातं, तिथे भारतीय प्रवासी Paytm अॅपचा वापर करून शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण, आणि स्थानिक अनुभवांसाठी पेमेंट करू शकतात. कंपनीने यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरीशस, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू केली आहे.
Paytm च्या मते, “Paytm UPI इंटरनॅशनल सर्व्हिस” प्रवाश्यांना परदेशात सहजपणे खर्च करण्यास सक्षम करते. दुबईतील रेस्टॉरंट्सपासून सिंगापूरच्या बाजारांपर्यंत, मॉरीशसच्या समुद्रकिनाऱ्यावरील शॉपिंग स्पॉट्सपासून भूतानच्या हस्तशिल्प दुकानांपर्यंत आणि नेपाळच्या स्थानिक दुकानांपर्यंत सर्व ठिकाणी आता UPI पेमेंट स्वीकारलं जाऊ शकतं.
Paytm UPI सेटअप कसा करावा?
Paytm अॅपवर UPI इंटरनॅशनल सेटअप करणे अत्यंत सोप्पं आहे. वापरकर्त्यांना एकदाच त्यांच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. परदेशात UPI QR कोड स्कॅन करताच, अॅप यूजरला ऑटोमॅटिकली UPI पेमेंट सेवा अॅक्टिव्हेट करण्याचा पर्याय देईल.
यूजर्स 1 ते 90 दिवसांपर्यंत ही सेवा वापरू शकतात आणि इच्छा असल्यास, ते आपल्या ट्रिपनंतर ही सेवा बंद करू शकतात. या फीचरमुळे भारतात परतल्यावर, कोणत्याही परदेशी दुकानदारांना अनवधानाने पेमेंट करण्याचा धोका टाळला जातो, ज्यामुळे यूजर्सचे पैसे सुरक्षित राहतात.
पेमेंट दर आणि शुल्कांची पारदर्शकता
Paytm UPI इंटरनॅशनल सेवा वापरताना, वापरकर्त्यांना परकीय चलन दर आणि बँकेने लावलेले कोणतेही अतिरिक्त शुल्क स्पष्टपणे दिसतील. Paytm च्या प्रवक्त्याने सांगितलं, “आम्ही भारतीय प्रवाश्यांना परदेशात सुरक्षित आणि कॅशलेस पेमेंटच्या माध्यमातून आरामदायक अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत. आगामी सुट्टीच्या हंगामात, आम्हाला विश्वास आहे की या लॉन्चमुळे प्रवास आणखी सोयीस्कर होईल.”
तसेच, Paytm ने UPI स्टेटमेंट डाउनलोड करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे, ज्यामुळे यूजर्स त्यांच्या सर्व व्यवहारांचा रेकॉर्ड सहजपणे पाहू शकतात.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!