जिओकडून नवा 601 रुपयांचा डेटा प्लॅन; वर्षभर मिळणार अमर्यादित 5G डेटा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास डेटा व्हाउचर प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन विशेषतः जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. फक्त 601 रुपयांत ग्राहकांना वर्षभरासाठी अमर्यादित 5G डेटा आणि 3GB हाय-स्पीड 4G डेटा मिळणार आहे.

प्लॅनची वैशिष्ट्ये

किंमत: 601 रुपये

वैधता: 365 दिवस

डेटा व्हाउचर: या प्लॅनमध्ये 12 वेगवेगळ्या डेटा व्हाउचरचा समावेश आहे. प्रत्येक व्हाउचरची किंमत 51 रुपये असून ते महिनाभरासाठी वैध आहे.

डेटा: मासिक व्हाउचर अंतर्गत अमर्यादित 5G डेटा आणि 3GB हाय-स्पीड 4G डेटा उपलब्ध.

इतर सुविधा: कॉलिंग आणि एसएमएस सुविधा या प्लॅनमध्ये समाविष्ट नाहीत.




कसा खरेदी कराल?

601 रुपयांचे व्हाउचर MyJio अॅप किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. खरेदी केल्यानंतर व्हाउचर ‘माय व्हाउचर’ विभागात दिसेल. तेथे ‘रिडीम’ पर्यायावर क्लिक करून डेटा सक्रिय करता येईल.

कोणासाठी उपयुक्त?

जिओचा हा डेटा प्लॅन मुख्यतः जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांना हे व्हाउचर इतरांना गिफ्ट म्हणूनही देता येईल. मात्र, एकदा व्हाउचर सक्रिय केल्यानंतर ते हस्तांतरित करता येणार नाही. तसेच, हा प्लॅन फक्त 1.5GB/दिवस वैधता असलेल्या बेस प्लॅन ग्राहकांसाठी लागू आहे.



जिओचे इतर व्हाउचर प्लॅन

याशिवाय, जिओने 101 रुपये आणि 151 रुपयांचे व्हाउचर प्लॅनही उपलब्ध केले आहेत.

101 रुपये प्लॅन: 6GB 4G डेटा आणि अमर्यादित 5G नेटवर्क

151 रुपये प्लॅन: 9GB 4G डेटा आणि अमर्यादित 5G नेटवर्क


जिओच्या या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना स्वस्तात भरपूर डेटा मिळण्याची संधी मिळत आहे.

Leave a Comment