भारत बनावट लोन ॲप्स डाउनलोड करण्यात जगातील पहिल्या 10 देशांमध्ये अग्रस्थानी आहे. मॅकॅफी सिक्युरिटी रिसर्चच्या अहवालानुसार, 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत लाखो लोकांनी त्यांच्या स्मार्टफोनवर धोकादायक आणि बनावट लोन ॲप्स डाउनलोड केले आहेत. हे ॲप्स युजर्सचे बँक तपशील चोरी करून हॅकर्सपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धोकादायक बनावट ॲप्सची यादी जाहीर
सिक्युरिटी रिसर्च फर्मने अशा 15 बनावट लोन ॲप्सची यादी तयार केली आहे, ज्यांनी आतापर्यंत 80 लाखांहून अधिक डाउनलोड्स गाठले आहेत. ही ॲप्स Google Play Store वर उपलब्ध होती, परंतु त्यातील बरीच ॲप्स गुगलने काढून टाकली आहेत. तरीदेखील, अनेक युजर्सच्या फोनवर ही ॲप्स अद्याप सक्रिय आहेत.
ही ॲप्स धोकादायक का आहेत?
हेही वाचा –
हे बनावट लोन ॲप्स युजर्सना फसवण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. युजर्स कर्ज मिळवण्यासाठी ॲपला फोन कॉल, मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन यांसारख्या संवेदनशील परवानग्या देतात. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरीला जाऊन तो हॅकर्सच्या ताब्यात पोहोचतो.
या ॲप्सच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करून त्यांना धमकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत.
15 बनावट लोन ॲप्सची यादी:
1. Préstamo Seguro-Rápido, seguro
2. Préstamo Rápido-Credit Easy
3. ได้บาทง่ายๆ-สินเชื่อด่วน
4. RupiahKilat-Dana cair
5. ยืมอย่างมีความสุข – เงินกู้
6. เงินมีความสุข – สินเชื่อด่วน
7. KreditKu-Uang Online
8. Dana Kilat-Pinjaman kecil
9. Cash Loan-Vay tiền
10. RapidFinance
11. PrêtPourVous
12. Huayna Money
13. IPréstamos: Rápido
14. ConseguirSol-Dinero Rápido
15. ÉcoPrêt Prêt En Ligne
काय कराल?
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरीलपैकी कोणतेही ॲप्स असतील, तर ते लगेच डिलीट करा. तसेच, कोणत्याही लोन ॲपला डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा तपशील आणि रिव्ह्यू काळजीपूर्वक तपासा.
गुगल प्ले स्टोअरवर सुरक्षितता बायपास
या बनावट ॲप्सनी Google च्या सुरक्षिततेला बायपास करत प्ले स्टोअरवर स्थान मिळवले. त्यामुळे, प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
फसवणूक टाळण्यासाठी टिप्स:
1. फक्त विश्वासार्ह आणि प्रमाणित लोन ॲप्सचा वापर करा.
2. ॲप इन्स्टॉल करण्याआधी त्याचे परवाने (Permissions) तपासा.
3. बँकिंग संबंधित तपशील कोणत्याही अनोळखी ॲप्ससोबत शेअर करू नका.
4. सिक्युरिटी अपडेट्स नेहमी इन्स्टॉल करा आणि तुमचा फोन अद्ययावत ठेवा.
फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना वाचवा. बनावट ॲप्सबाबत जागरूक राहा आणि इतरांनाही माहिती द्या.
- Casio G-Shock: स्टाईल आणि टिकाव यांचा जबरदस्त संगम
- HSRP नंबर प्लेट कसे बनवाल तेही आपल्या मोबाईलवरून
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2024 पिक विमा भरपाईसाठी 1028 कोटींचा निधी वितरीत
- IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फेल? पहिल्या दिवशी टीम इंडिया मानसिक लढाईत सरस!
- लॉर्ड्स कसोटी : नितीश कुमार रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्याच षटकात दोन विकेट्स