दिल्ली विद्यापीठाने (DU) २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी (UG) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी कॉमन सीट अलोकेशन सिस्टिम (CSAS) UG 2025 पोर्टल आजपासून अधिकृतरीत्या सुरु केले आहे. इच्छुक विद्यार्थी ugadmission.uod.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करू शकतात.
प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार:
पहिला टप्पा: विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि CUET-UG 2025 चे अर्ज क्रमांक पोर्टलवर भरावे लागतील.
दुसरा टप्पा: CUET-UG निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना आपली पसंतीची अभ्यासक्रम व महाविद्यालये निवडायची संधी दिली जाईल.
मुख्य बाबी:
नोंदणीची सुरुवात: १७ जून २०२५
CUET-UG निकाल: जुलैच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित
अभ्यासक्रम: ७९ हून अधिक UG कोर्सेस
महाविद्यालये: सुमारे ६९
एकूण जागा: अंदाजे ७१,००० ते ८५,०००
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एकदा CUET निकाल लागल्यानंतर, लवकरात लवकर दुसरा टप्पा पूर्ण करून पसंतीचे कोर्स आणि महाविद्यालय निश्चित करणे आवश्यक आहे.
नोंदणी कशी करावी:
1. ugadmission.uod.ac.in या वेबसाइटला भेट द्या
2. “New Registration” वर क्लिक करा
3. सर्व आवश्यक माहिती भरा – वैयक्तिक, शैक्षणिक, CUET अर्ज क्रमांक
4. फॉर्म सबमिट करा आणि दुसऱ्या टप्प्याची वाट पहा
सीट वाटप एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये होईल. प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना सीट स्वीकारण्याची किंवा पुढील फेरीत अपग्रेड घेण्याची संधी दिली जाईल. विद्यापीठाने मार्गदर्शनासाठी हेल्पडेस्क आणि FAQ विभाग उपलब्ध करून दिला आहे.