सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, परंतु काही व्हिडिओ असतात जे आपल्या मनाला स्पर्श करतात. सध्या अशीच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक आनंदित आजी लग्नाच्या डान्स फ्लोअरवर तल्लीन होऊन नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाचे वातावरण उत्साही आणि आनंददायक आहे. लोक नाचत आहेत आणि त्यात एक आजी देखील त्यांच्या उत्साहात सामील होतात.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आजी अतिशय आनंदाने नाचत असताना इतर लोकही तिच्या सोबत नाचताना दिसतात. मात्र, एक काकू आजींना स्टेजवरून घेऊन जातात, पण आजी पुन्हा येऊन नाचू लागतात. तिच्या या नाचण्यामुळे इतर लोक हसतात आणि व्हिडिओ खूपच मजेदार होतो. या व्हिडिओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @ghantaa हॅण्डलवर शेअर करण्यात आले आहे आणि तो सध्या लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मजेदार संदेश दिला आहे, “मी कधीही मरु शकते सांगून नातवाला लग्न करायला लावले.” अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने “आजी रॉक, पब्लिक शॉक” असे लिहिले, तर दुसऱ्या युजरने “आजी नादच खुळा” असे म्हटले. एकाने म्हटले की, “असे आनंदात जगता आले पाहिजे.”
अशा मजेदार व्हिडिओंनी सोशल मीडियावर आनंद आणला आहे आणि ते लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत.
(टीप: हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि लेखाच्या माध्यमातून वाचकांना योग्य आणि अयोग्य व्हिडिओंबाबत दाखवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही या व्हिडिओबाबत कोणतेही विश्लेषण करत नाही.)
- Casio G-Shock: स्टाईल आणि टिकाव यांचा जबरदस्त संगम
- HSRP नंबर प्लेट कसे बनवाल तेही आपल्या मोबाईलवरून
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2024 पिक विमा भरपाईसाठी 1028 कोटींचा निधी वितरीत
- IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फेल? पहिल्या दिवशी टीम इंडिया मानसिक लढाईत सरस!
- लॉर्ड्स कसोटी : नितीश कुमार रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्याच षटकात दोन विकेट्स