कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनेता आदर जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काल या दोघांचा रोका सोहळा पार पडला, ज्यामध्ये कपूर कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली.
करीना कपूर खानने पाहुण्यांचे स्वागत करत प्रमुख भूमिका पार पाडली, तर करिष्मा कपूर पापाराझींना पोज देताना चुकून अडखळली आणि पडता पडता वाचली. मजेशीर अंदाजात करिष्माने पापाराझींना व्हिडिओ व्हायरल करू नका असे सांगितले, मात्र तोपर्यंत तो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता.
रोका सोहळ्यासाठी आदर आणि अलेखा पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात झळकत होते. करीना सुंदर डिझायनर साडीत तर करिष्मा चुडीदार घालून दिसत होती. कपूर कुटुंबातील रणधीर कपूर, बबिता कपूर, नीतू कपूर आणि रणबीर कपूर यांच्यासह अनेक सदस्यांनी या आनंदसोहळ्याला हजेरी लावली.
आदर जैन पूर्वी अभिनेत्री तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तारा कपूर कुटुंबाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे, आणि तीच कपूर कुटुंबाची सून होणार असल्याची चर्चा होती. मात्र, दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांतच आदर आणि अलेखा यांनी आपले नाते जाहीर केले. विशेष म्हणजे अलेखा ही ताराची बेस्ट फ्रेंड आहे.
कपूर कुटुंबाचा हा खास क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
- Hero Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च: सर्वात स्वस्त किंमतीत स्मार्ट फीचर्स आणि हटके बॅटरी प्लान
- Motorola ने भारतात लॉन्च केला दमदार Moto G96 5G स्मार्टफोन; किंमत ₹17,999 पासून
- SIP च्या माध्यमातून १० वर्षांत बना कोटीपती! जाणून घ्या संपूर्ण योजना
- कर्नाटकमधील गुहेत दोन मुलींंसह राहणारी रशियन महिला सापडली, व्हिसा २०१७ पासून कालबाह्य
- जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण