वर्षभराचा रिचार्ज फक्त 1198 रुपयात आणि मिळतील या सर्व सुविधा

BSNL चा स्वस्त आणि दीर्घकाळासाठी लाभदायक रिचार्ज प्लान:सध्या जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे युजर्स स्वस्त आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्लान्सच्या शोधात आहेत. जर तुम्हाला वारंवार रिचार्ज न करता एकाच रिचार्जमधून वर्षभराची वैधता मिळवायची असेल, तर बीएसएनएलचा नवीन प्लान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

 

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 365 दिवसांची वैधता असलेला एक आकर्षक रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत फक्त 1198 रुपये आहे, ज्यामध्ये युजर्सना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस यासारख्या सर्व सुविधा मिळतात. ह्या प्लानमुळे महिन्याला फक्त 100 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो, त्यामुळे कमी बजेटमध्ये दीर्घकाळ टिकणारा प्लान शोधत असलेल्या युजर्ससाठी हा प्लान योग्य ठरतो.

वाचा सविस्तर: Apple, Google, Samsung ला टक्कर देण्यासाठी येत आहेत हे 3 तगडे स्मार्टफोन, एक तर थेट IPhone ला देतोय आव्हान

या प्लानमध्ये मिळणाऱ्या सुविधा

मासिक कॉलिंग मिनिटे: युजर्सना प्रत्येक महिन्याला 300 मिनिटे कॉलिंगची सुविधा मिळते, ज्याद्वारे ते संपूर्ण भारतात कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकतात.

डेटा: यामध्ये दर महिन्याला 3GB डेटा उपलब्ध आहे. जर तुम्हाला दररोज मोठ्या प्रमाणात डेटा वापरण्याची गरज नसल्यास हा डेटा पुरेसा ठरू शकतो.

एसएमएस: दर महिन्याला 300 एसएमएसची सुविधा देखील मिळते.

इतर चार्जेस

जर युजर्स मासिक मर्यादेपेक्षा अधिक वापर करू इच्छित असतील, तर त्यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल:

व्हॉईस कॉलिंग: लोकल कॉलसाठी 1 रुपया प्रति मिनिट, एसटीडी कॉलसाठी 1.3 रुपये प्रति मिनिट

व्हिडिओ कॉलिंग: लोकल आणि एसटीडीसाठी 2 रुपये प्रति मिनिट

एसएमएस: लोकल 80 पैसे प्रति एसएमएस, नॅशनल 1.20 रुपये प्रति एसएमएस, इंटरनॅशनल 6 रुपये प्रति एसएमएस

डेटा: 25 पैसे प्रति एमबी

मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा

बीएसएनएलच्या या प्लानमध्ये मोफत नॅशनल रोमिंगची सुविधाही आहे. त्यामुळे, तुम्ही भारतात कुठेही असलात तरी कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

बीएसएनएलचा हा प्लान कमी बजेटमध्ये दीर्घकालीन वैधता मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. जर तुमची डेटाची गरज कमी असेल आणि फक्त सिम कार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज प्लान शोधत असाल, तर बीएसएनएलचा 1198 रुपयांचा हा प्लान तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो.

वाचा पुढील लेख: आयुष्मान वय वंदना कार्ड: घरी बसून पाच लाखांचा मोफत विमा कसा मिळवावा? » NewsViewer Marathi | न्यूज व्हीवर