भारतात मोबाईलचे रिचार्ज 28 दिवसाचे का असतात? जाणून घ्या, हे धक्कादायक कारण येत आहे समोर

28 days internet plan in India:
भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे विविध टेलिकॉम कंपन्या, जसे की एअरटेल, जिओ, आणि व्होडाफोन-आयडिया (वी आय), प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विविध योजना उपलब्ध करत आहेत. तथापि, एक गोष्ट जी ग्राहकांना सतत गोंधळात टाकते, ती म्हणजे कंपन्यांकडून दिले जाणारे इंटरनेट प्लॅन प्रामुख्याने 28, 56 किंवा 84 दिवसांसाठी का असतात?

तज्ञांच्या मते, भारतीय टेलिकॉम कंपन्या इंटरनेट प्लॅन्सचे वैधता कालावधी 28 दिवसांचा का ठेवतात, यामागे एक खास रणनीती आहे. पूर्वी, काही कंपन्या 30 दिवसांच्या प्लॅन्सची ऑफर करत असत, परंतु सध्या सर्वच कंपन्यांचे प्लॅन्स 28 दिवसांच्या कालावधीसाठी दिले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांना वर्षभरात 12 पेक्षा जास्त रिचार्ज करण्याची आवश्यकता असते.

28 दिवसांच्या योजनेमुळे, ज्या महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात, त्या महिन्यात 2 ते 3 अतिरिक्त असतात. फेब्रुवारी महिन्यात मात्र, 28 किंवा 29 दिवस मिळतात. त्यामुळे, कंपन्यांना वर्षभरात एक अतिरिक्त महिना मिळतो आणि त्यांना अधिक 1 रिचार्जचे पैसे मिळतात.



दरम्यान, BSNL आजही 30 दिवसांचा इंटरनेट प्लॅन ऑफर करते, परंतु इतर कंपन्यांच्या 28 दिवसांच्या प्लॅन्सच्या तुलनेत त्याची लोकप्रियता कमी आहे.

TRAI ची भूमिका


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही काळापूर्वी कंपन्यांना 28 दिवसांच्या प्लॅन्सऐवजी 30 दिवसांचे प्लॅन्स ऑफर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची शक्यता दर्शवली होती. परंतु, अद्याप अशी कोणतीही अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेलेली नाहीत, आणि त्यामुळे कंपन्यांचे प्लॅन्स पूर्वीप्रमाणेच 28 दिवसांच्या वैधतेसह सुरू आहेत.

अशा परिस्थितीत, ग्राहकांना अधिक स्वस्त आणि स्पष्ट पर्याय मिळविण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यासाठी नियामक संस्थेने कायद्यात बदल केले की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment